गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करणार्‍या अधिकार्‍याला जीवे मारण्याचा प्रयत्न

तीघां विरुद्ध गुन्हा दाखल, डंपरसह चारचाकी जप्त, भोनक नदी जवळील घटना
कारवाईत जप्त करण्यात आलेली कार (छाया- अरुण पाटील)
कारवाईत जप्त करण्यात आलेली कार (छाया- अरुण पाटील)

यावल - प्रतिनिधी Bhusawal

अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसुल विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या अंगावर वाहन आणून त्यांना धमकावणे व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी यावल पोलिसात तीघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील किनगाव बु येथे प्रांत. अधिकारी कैलास कडलक व यावल तहसीलदार महेश पवार यांच्या आदेशान्वये किनगाव मंडळाधिकारी सचिन जगताप हे सहकारी तलाठी विलास नागरे दहिगाव, तलाठी टेमसिंग बारेला (मालोद), तलाठी नितीन निसाळ (चिंचोली), तलाठी राजू गोरटे (आडगाव), कोतवाल दहीगाव विजय साळवे, किनगाव कोतवाल गणेश वराडे यांच्यासह किनगाव गावाजवळ २८ फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अवैध गौण खनिज विरोधी वाहतूक संदर्भात कारवाईसाठी फिरत असतांना डंपर क्र.एमएच १२ एफ.झेड. ८४२५ हा किनगाव गावाजवळ आढळून आला. त्यावरील चालक गणेश संजय कोळी (रा. कोळन्हावी) सोबत विशाल कोळी यांनी सदर डंपर पळवून नेण्याचा प्रयत्न केला डंपरचा पाटलाग करून पकडवून वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता चारचाकी एमएच १९ एपी ४१२८ वरील चालक गोपाळ प्रल्हाद साळुंके यांनी तुम्हाला डंपर पकडण्याचा काही एक अधिकार नाही? तुम्ही डंपर का पकडले?अशी हुज्जत घातली व शासकीय कामात अडथळा केला. सचिन जगताप यांच्या छातीवर बुक्का मारून ढकलून दिले. त्याचे सोबत दीपक आधार सोळंके व छगन कोळी यांनी शिवीगाळ केली.

सदर डंपर हे कार्यवाहीसाठी यावल पोलीस स्टेशनला नेत असताना डंपर चालकांनने साकळी गावाजवळ भोनक नदीच्या दिशेने पळवून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी डंपरमध्ये बसलेले महसूल चे कर्मचारी विजय साळवे व टेंमसिंग बारेला यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करून डंपरमधून उतरून लावले त्यावेळी सचिन जगताप व सहकार्‍यांसह डंपरच्या मागे येऊन डंपर अडवून कार्यवाही करीत असताना १०:३० वाजेच्या सुमारास चारचाकी क्र. एम.एच. १९ ए.पी. ४१२८ मधील चालक गोपाळ प्रल्हाद साळुंके यांनी सदर कार मंडळ अधिकारी सचिन जगताप यांचे दिशेने जोरात आणून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व शासकीय कामात अडथळा आणला.

याबाबत किनगाव मंडळाधिकारी सचिन जगताप यांच्या फिर्यादीवरून सदर डंपर व चारचाकी संदर्भात पोलीस स्टेशनला आरोपी गणेश संजय कोळी, गोपाळ प्रल्हाद साळुंखे, संदीप आधार साळुंखे (रा. कोळन्हावी), विशाल कोळी, छगन कोळी (रा. डांभुर्णी ता. यावल पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध यावल पोलीसात गु.र.नं. ३५/२०२१, भा.द.वि. ३०७, ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६, ३४, १८८ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ सह महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com