जळगाव : भरदिवसा १० वर्षाच्या बालिकेवर अत्याचार
जळगाव

जळगाव : भरदिवसा १० वर्षाच्या बालिकेवर अत्याचार

गोलाणी मार्केटमधील घटना

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरु असल्याने नेहमी गजबजणारे शहरातील गोलाणी मार्केटमध्ये शुकशुकाट आहे. या संधीचा फायदा घेत गोलाणी मार्केटच्या तिसर्‍या मजल्यावर शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास एका नराधमाने १० वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पीडित बालिका आपल्या आजीसोबत भिक मागून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती समोर आली आहे.

शहरातील गोलाणी मार्केटजवळ असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे पीडित बालिका उभी होती. त्यावेळी एका तरुणाने तुला खायला देतो, असे सांगून त्या बालिकेला गोलाणी मार्केटच्या तिसर्‍या मजल्यावर नेले. तिसर्‍या मजल्यावरील एका प्रसाधनगृहात नेत त्या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला आणि घटनास्थळावरुन त्याने तेथून पळ काढला.

ही घटना शुक्रवार दि.१० रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. पीडित बालिका रक्ताने माखलेल्या कपडयांवर रडत रडत खाली आपल्या आजीकडे आली आणि घडलेली सर्व आपबिती तिने आजीला सांगितली.

त्यानंतर पीडित बालिकेच्या आजीने नातीला सोबत घेत शहर पोलीस ठाणे गाठले. महिला पोलिसांनी तात्काळ गोलाणी मार्केटला भेट देवून पीडित बालिकेकडून घटनास्थळाबाबत माहिती जाणून घेतली, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com