जळगावचे ॲड.अजय तल्हार असिस्टंट सॉलिसीटर जनरल
जळगाव

जळगावचे ॲड.अजय तल्हार असिस्टंट सॉलिसीटर जनरल

तीन वर्षे कालावधीसाठी झाली ही निवड

Rajendra Patil

जळगाव - प्रतिनिधी - Jalgaon

खान्देशचे सुपुत्र मुळ धरणगाव येथील रहिवाशी प्राचार्य ग.म.तल्हार यांचे सुपुत्र अँड.अजय तल्हार यांची राष्ट्रपतींनी मुंबई हायकोर्टच्या औरंगाबाद खंडपीठाच्या असिस्टन्ट सॉलिसीटर जनरल ऑफ इंडिया या पदासाठी तीन वर्षाच्या कालावधीसाठी 17 जुलै 2020 रोजी नियुक्ती केली. ते केंद्र शासनाचे वकील म्हणून काम पाहणार आहेत.

जळगाव येथील मु.जे. महाविद्यालय येथे शिक्षण घेवून इंडियन लॉ सोसायटी, पुणे येथे 1996 साली त्यांनी पदवी प्राप्त केली. विषयांचा अभ्यास व चिकाटी आपल्याकडे आलेल्या पक्षकाराला त्याच्या असलेल्या कायदेशीर अडचणींचा अभ्यास करून चाकोरीत राहून कमीत कमी खर्चात कसा न्यायमिळवून देता येईल हा त्यांचा आजवरचा कार्यभाव राहिला आहे. त्यांचा आर्थिक, औद्योगिक क्षेत्रातील गाढा अभ्यास व अनुभव शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा या संदर्भात त्यांनी औरंगाबाद येथे मोठी चळवळ उभारली होती.

त्यांनी औरंगाबाद येथील जेष्ठ विधीज्ञ वकील राजेंद्र रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कार्याला सुरूवात केली होती. आपल्या जन्मभूमीशी त्यांनी त्यांचे नाते घट्ट ठेवले म्हणून महिन्याच्या दुसऱ्या व चवथ्या रविवारी ते जळगाव येथे येत राहिले.

त्यांचा वकीली क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये, व्यापारी उद्योग जगतात व शेतकऱ्यांमध्ये मोठा मित्र परिवार आहे. आज त्यांनी मुंबई हायकोर्टच्या औरंगाबाद खंडपीठ येथे पदभार स्वीकारला. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com