तीस वर्ष गाळे नूतनीकरणासाठी नगरविकास मंत्र्यांना साकडे

गाळेधारकांनी नामदार एकनाथ शिंदे, नाना पटोले यांची मुंबईत घेतली भेट
तीस वर्ष गाळे नूतनीकरणासाठी नगरविकास मंत्र्यांना साकडे

जळगाव jalgaon

मनपा Municipal Corporation मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील Expired merchant packages गाळ्यांचा तिढा कायम आहे. हा तिढा सोडवावा. या मागणीसाठी मनपा गाळेधारक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे Urban Development Minister Eknath Shinde आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Congress state president Nana Patole यांची मुंबईत भेट घेतली. थकबाकीवरील शास्ती, गाळ्यांचा जाहीर लिलाव रद्द करावा. आणि तीस वर्षांसाठी गाळे नूतनीकरण करुन द्यावे अशी मागणी गाळेधारकांनी यावेळी केली. दरम्यान, याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. असे आश्‍वासन नामदार शिंदे यांनी दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे Dr. Shantaram Sonawane यांनी दिली.

मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा प्रश्‍न मार्गी लावावा. या संदर्भात गाळेधारक संघटनेतर्फे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे मागील महिन्यात जिल्हा दौर्‍यावर आले असता, निवेदन देण्यात आले होते. याप्रसंगी नामदार शिंदे यांनी मुंबईला येण्यासंदर्भात संघटनेला निमंत्रण दिले होते. त्यानुसार गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांतराम सोनवणे, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, राजस कोतवाल, तेजस देपूरा, सुरेश पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासोबतच पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीदेखील भेट घेवून निवेदन दिले.
रेडीरेकनरचा दर कमी करावा


गाळे भाडे दर आकारणी करतांना मनपा प्रशासनाने आठ टक्के रेडीरेकनरची आकारणी करुन गाळेधारकांना बील दिले आहे. ही आकारणी अवाजवी असल्याचे गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी नगरविकास मंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच अव्यावसायिक १६ मार्केटसाठी २ टक्के रेडीरेकनर तर व्यावसायिक मार्केटसाठी ४ टक्के रेडीरेकनर दरानुसार आकारणी करावी. अशी मागणी करण्यात आली.


धोरणात्मक निर्णय घेणार-ना.शिंदे


गाळेधारक संघटनेतर्फे मनपाने १२ मे २०२१ रोजी केलेल्या ठरावाच्या विरुध्द नगरविकास मंत्र्यांकडे अपील दाखल केले आहे. तसेच तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा केली. दरम्यान, गाळेधारकांचे हित आणि महापालिकेचेही नुकसान होणार नाही. अशा प्रकारे, धोरणात्मक निर्णय लवकरच घेण्यात येईल. असे आश्‍वासन ना. शिंदे यांनी गाळेधारक संघटनेला दिले आहे. तसेच मनपा आयुक्त सतीष कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवरुन ना.शिंदे यांनी चर्चा केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com