जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आज 17 फेब्रुवारी रोजी देखील जिल्हाभरात 74 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 57 हजार 852 एवढी झाली आहे.

तसेच दिवसभरात 1 जणाचा मृत्यू झाला असून 40 जण कोरोनामुक्त झाले आहे. तीन दिवसांपासून बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात रुग्णांचा आलेख वाढतच असल्याने प्रशसानाची चिंता चांगलीच वाढली आहे.

जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या तीन तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 55 हजार 930 जणांनी कोरोनावर मात केली आहे . तर दुसरीकडे आतापर्यंत 1 हजार 369 बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 35, जळगाव ग्रामीण 2, भुसावळ 9, अमळनेर 2, चोपडा 5, पाचोरा 1, भडगाव 1, धरणगाव 1, एरंडोल 5, जामनेर 1, पारोळा 3, चाळीसगाव 8 यासह इतर जिल्ह्यातील 1 असे एकूण 74 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच बुधवारी दिवसभरात भुसावळातील एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात 614 जणांनी घेतली लस

जिल्ह्यातील एकवीस केंद्रावर आज लसीकरणाची मोहिम पार पडली. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 86, जामनेर 30, चोपडा 39, मुक्ताईनगर 34, चाळीसगाव 14, पारोळा 8, भुसावळ 19, अमळनेर 34, पाचोरा 55, रावेर 59, यावल 43, गाजरे हॉस्पिटल 75, गोल्डसिटी जळगाव 81, भडगाव 21, बोदवड 17, एरंडोल 44, भुसावळ रेल्वे हॉस्पीटल 0, ऑर्कीड हॉस्पीटल 38, धरणगाव 59, डी. बी. जैन रुग्णालय जळगाव 1, एमडी भुसावळ 2 असे एकूण 759 जणांनी लस टोचून घेतली. आतापर्यंत 16 हजार 152 जणांनी लस घेतली. तसेच आज दिवसभरात जिल्ह्यातील 232 जणांनी दुसरा लसीचा दुसरा डोस घेतला.