गौराईंचे सोनपावलांनी आगमन

पंचपक्वानांचा आज दाखविणार नैवद्य
गौराईंचे सोनपावलांनी आगमन

जळगाव । jalgaon

गणरायाच्या आगमनापाठोपाठ वेध लागतात ते गौराईंच्या आगमनाची (Advent of Gaurai) ! त्यासाठी घरातील महिलांची लगबग सुरु होते. अनेक घरांमध्ये तीन दिवसांची माहेरवाशीण म्हणून येणार्‍या गौरीचे स्वागत(welcome) करण्याची तयारी पुर्ण झाली असून रविवारी ज्येष्ठा-कनिष्ठा महालक्ष्मी गौरींचे (Gaurai)) मोठ्या भक्तीमय वातावरणात (devotional atmosphere) आगमन (Arrival) झाले. सोमवारी गौराईंना पंचपक्वानांचा नैवद्य दाखविला जाणार आहे.

विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनानंतर सुख-समृद्धी व वैभवाचे प्रतीक असलेल्या ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी गौरींचे रविवारी आगमन झाले. गौरीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर घरांघरांमध्ये साहित्य सजावट आरास करण्यासाठीची लगबग सुरू होती. ती लगबग पुर्ण झाल्यानंतर आज दुपारी 9 वाजेनंतर शुभमुहूर्तावर गौरांची विधीवत पुजन करुन त्यांचे आगमन झाले.

गौरी बसवण्याच्या पद्धती, अनेक घरांमध्ये चालीरीती वेगवेगळ्या आहत. गौरी सण हा नक्षत्र प्रधान असून अनुराधा नक्षत्रावर आवाहन तर दुसर्‍या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन व महानैवेद्य तर तिसर्‍या दिवशी मूळ नक्षत्रावर विसर्जन करण्याचा प्रघात आहे. काही ठिकाणी उभ्या गौरी, कुठे खड्यांच्या गौरी, कुठे माठावर, बसविल्या जात असल्याने परंपरेनुसार सर्व घरांमध्ये गौराईच्या आगमन झाले.

घरोघरी बसविण्यात आलेल्या गौरींची उत्साहात पुजा केली जात आहे. सोमवारी दुपारी महाआरती नंतर गौरींना पुरणपोळीस सोळा प्रकारच्या विविध भाज्यांचा नैवेद्य दाखविण्यात येणार असून त्यानंतर महाप्रसाद दिला जात असतो.

माहेरवाशीणींसोबत रात्री जागविण्याची प्रथा

गौरींच्या आगमनाबरोबरच घरांमध्ये चैतन्यमय वातावरण असल्याने घरांमध्ये झिम्मा फुगडी, बस फुगडी यासह विविध प्रकारचे खेळ खेळून जागरण करण्याची प्रथा आहे. घरी आलेल्या माहेरवाशीणीसोंबत रात्री जागविण्याची देखील प्रथा असल्याने ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com