भुसावळ : गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगणाऱ्यास अटक
जळगाव

भुसावळ : गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगणाऱ्यास अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Rajendra Patil

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ पुन्हा एका आरोपीस तीस हजार रुपये किमतीच्या गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसे सहित बुधवार दि.१५ जुलै २०२० रोजी पहाटे ५ वाजेला

अटक करण्यात आली आहे.

जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीस स्टेशनला दाखल असलेला गुरन ३७७/२०२० गुन्ह्याच्या तपास कामी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि स्वप्नील नाईक,पोहेकॉ कमलाकर बागुल,पोना दादाभाऊ पाटील (चालक),पोना प्रवीण हिवराळे फिरत असतांना सपोनि स्वप्नील नाईक यांना गोपनीय बातमी मिळाली.

अंजाळे येथील राहणारा संशयीत आरोपी सागर बापूराव सपकाळे (वय २० ते २५) हा यावल नाक्याजवळ फॉरेस्टच्या चौकी जवळ उभा असून त्याच्या जवळ गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यावरुन सपोनि स्वप्नील नाईक व कमलाकर बागुल यांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले चौकशी करून अंगझडती घेतली असता त्याच्या जवळून एक गावठी कट्टा व ५ जिवंत काडतुस असा सुमारे ३२ हजार ५०० रुपये किंमतीचा शस्त्रसाठा मिळून आला.

या इसमाजवळ गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगण्याचा कुठलाही परवाना नसून शस्त्र घेवून सार्वजनिक जागी फिरत असल्यामुळे पोहेकॉ रविंद्र भगवान पाटील (स्था.गु.शा) जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ शहर पोलीस स्टेशनला आरोपीसह गावठी कट्टा व जिवंत काडतुस जमा करण्यात आले तसेच गुरुन ३८२/२०२० प्रमाणे आर्म अँक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com