पाच कोटींच्या विकास कामांना मान्यता

विद्युत पोल स्थलांतरासह रस्ते, सुशोभिकरणाची विकास कामे
पाच कोटींच्या विकास कामांना मान्यता

जळगाव- Jalgaon

शासनाने २०१७ मध्ये जळगाव शहराच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी दिला होता. या निधीतून काही विकास कामांसाठी प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्या अनुषंगाने शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या Shivajinagar flyover रस्त्यातील वीज वाहिनी स्थलांतर करण्यासह अन्य विकास कामांसाठी ४ कोटी १६ लाख ८४ हजार ५८२ रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नगरविकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी जारी केले आहे.

महापालिका Municipal Corporation क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत २०१७ मध्ये २५ कोटींचा निधी देण्यात आला होता. यातील काही कामे रद्द करुन शिल्लक असलेल्या अनुदानातून विकास कामे करण्यासंदर्भात प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार ४ कोटी १६ लाख ८४ हजार ५८२ रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे.

या कामांचा आहे समावेश
शासनाने मान्यता दिलेल्या विकास कामांमध्ये विद्युत पोल स्थलांतरासह डांबरीकरण, स्मशानभूमीचे सुशोभिकरण अशा कामांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये वार्ड क्र. १९ मधील सुप्रिम कॉलनीच्या Supreme Colony परिसरात पथदिव्यांची व्यवस्था करणे, शिवाजीनगर रेल्वे उड्डाण Shivajinagar flyover पुलाच्या रस्त्यावरील वीज वाहिनी स्थलांतरीत करणे, चौघुले प्लॉटमधील रस्ते डांबरीकरण करणे, स्वच्छता गृहाची व्यवस्था करणे, डी-मार्ट ते रामेश्‍वर कॉलनीतील आदित्य चौकापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, पिंप्राळा स्मशानभूमी सुशोभिकरण करुन विकसीत करणे, प्रभाग क्र. १२ मधील रामदास कॉलनीतील ओपन स्पेसवर संरक्षण भींत बांधणे या विकासकामांना शासनाने मान्यता दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com