चाळीसगाव न.पा.मुख्याधिकारीपदी शंकरराव गोरे यांची नियुक्ती
जळगाव

चाळीसगाव न.पा.मुख्याधिकारीपदी शंकरराव गोरे यांची नियुक्ती

तब्बल १३ महिन्यांनतंर पूर्णवेळ मुख्याधिकारी

Manohar Kandekar

चाळीसगाव | प्रतिनिधी Chalisgaon

चाळीसगाव पालिकेला तब्बल १३ महिन्यांपासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नव्हते. आता नवीन मुख्याधिकारी म्हणून शंकरराव गोरे यांची नियुक्ती झाली आहे. याबाबत ११ ऑगस्टला आदेश निघाले.२४ जुलै २०१९ तत्कालिन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर पंढपूरपूर येथे बदली. त्यांच्या जागी जमीर लेंगरेकर यांची नियुक्ती झाली होती.

मात्र, त्यांनी चाळीसगावात पदभार स्वीकारला नाही. यामुळे हे पद रिक्त होते. तेव्हापासून पालिकेत प्रभारीराज सुरू होते. सत्ताधारी भाजपा अतर्ंगत राजकारण व विरोधकांच्या गोंधळामुळे चाळीसगावात नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून कोणी येण्यास तयार होत नसल्याची मध्यतंरी चर्चा होती.

नवीन नियुक्त झालेले मुख्याधिखारी शंकरराव गोरे यांनी यापूर्वी देखील चाळीसगाव न.पा.च्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी संभाळली आहे. परंतू तेव्हाची परिस्थिती आणि आताच्या राजकिय परिस्थितीत खूप मोठा फरक असल्यामुळे शंकरराव गोरे यांना कामकाज करतांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com