अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघाच्या सल्लागार समितीत अशोकभाऊ जैन यांची नियुक्ती

दिल्ली येथे संपन्न झाली महासंघाची सभा
अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघाच्या सल्लागार समितीत अशोकभाऊ जैन यांची नियुक्ती

जळगाव - प्रतिनिधी Jalgaon

दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या (All India Chess Federation) सभेत जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे (Jain Irrigation Systems Ltd.) अध्यक्ष व महाराष्ट्र चेस असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक भवरलाल जैन (Ashok Bhavarlal Jain) यांची महासंघाच्या सल्लागार समिती मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे.

बुद्धिबळाच्या विकासासाठी खेळाडूंच्या कौशल्य आणि क्षमता विकसित करण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करणे, योग्य प्रशिक्षण, सुविधा आणि मार्गदर्शन तसेच बुद्धिबळ खेळातील होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे महत्वाचे कार्य अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ करत असते.

क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या तसेच स्वच्छ प्रतिमा, संघटन कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या अशोकभाऊ जैन यांच्या कार्याची दखल घेत बुद्धिबळाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाच्या अशा महासंघाच्या सल्लागार समितीत नियुक्ती करण्यात आलेली आह. राष्ट्रीयस्तरावरील अशोक जैन यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्र चेस असोसिएशनचे पदाधिकारी, बुद्धिबळ खेळाडू तसेच क्रीडाप्रेमींमधून आनंद व्यक्त होत आहे.

या सभेस अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय कपूर, सचिव भरतसिंग चौहान, महासंघाचे मुख्य प्रशिक्षक व चेअरमन अभिजीत कुंटे, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धार्थ मयुर. सचिव निरंजन गोडबोले यांच्यासह विविध राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com