भुसावळ (प्रतिनिधी) bhusawal-

लाड समितीच्या शिफारशीनुसार येथील १६ सफाई कामगारांची १९ रोजी वारसा हक्काने नियुक्ती करण्यात आली तसेच एकाची पदोन्नती करण्यात आल्याची माहिती येथील पालिका सुत्रांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, लाड समितीच्या शिफारशीनुसार, पालिकेतील मयत किंवा सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या वारसांना लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने सफाई कामगार म्हणुन दि. १९ रोजी नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, उपमुख्याधिकारी महेंद्र कातोरे, नगरसेवक सोनी बारसे, नगरसेवक ऍड. बोधराज चौधरी, युवराज लोणारी, प्रा.डॉ. दिनेश राठी, प्रमोद नेमाडे, वर्कर्स युनियन अध्यक्ष राजु पाटील यांची उपस्थिती होती.

अस्थापना प्रमुख चेतन पाटील, सहा. कर्मचारी रवींद्र पाठक, वैभव पवार यांच्या सहकार्याने १६ सफाई कामगारांना नियुक्ती देण्यात आली त्यात तृष्णा सुरेश करोसिया, नितीन संगेले, दिनेश ठाकुर, रोहित टाक, हेमा अजय सोनवाल, लक्ष्मी पथरे, नितीन ढिक्याव, अर्जुन गोहर, पवन ढंढोरे, अजय चावरे, मनीष तुरकेले, राहुल बडगुजर, श्रावण तुरकेले, सागर संगेलेे, पवन टाक, अनिता चुन्नीलाल टाक यांचा तर अजय वसंत जेधे यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

कर्मचार्यांच्या नियुक्तीमुळे सफाई कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.