शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरा नाही तर...

पाटबंधारे विभागाने केले आवाहन
शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरा नाही तर...

गुढे.ता.भडगाव वार्ताहर - Bhadgaon

सलग दोन वर्षापासून गिरणा धरण शंभरटक्के भरले असून गिरणा धरणातून यंदाच्या रब्बी हंगामासाठी तीन पाण्याचे आर्वतन सोडले जाणार असून गिरणा धरणावर अवलंबून असणाऱ्या जामदा डावा, उजवा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पाणी मागणीचा अर्ज पाटबंधारे विभागाकडे आपल्या गांव परिसर क्षेत्रातील कार्यालयाकडे ३१ डिसेंबर पर्यंत करावा असे जाहीर आवाहन उपविभागीय अधिकारी भडगाव यांनी केले आहे.

नुकत्याच २६ नोव्हेंबर रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली असून या बैठकीत रब्बी हंगामासाठी तीन पाणी आर्वतन सोडण्याचा निर्णय झाला आहे.

सदर पाण्याचे आर्वतन हे २८ फेब्रुवारी २०२१ अखेर तीन आवर्तन देण्याचे कालवा सल्लागार समिती व गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव यांनी नियोजन केले आहे. तरी गिरणा प्रकल्पा अंतर्गत येणारा जामदा डावा,उजवा कालवा, व गिरणा नदी यांचा लाभ घेणारे लाभार्थी शेतकऱ्यांनी संबंधित शाखा कार्यालयात दि.३१ डिसेंबर २०२० पर्यंत पाणी मागणी अर्ज सादर करावे. जेणेकरून पाण्यावर आपला हक्क कायम राहील असे पाटबंधारे विभाग भडगाव यांनी कळविले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com