हिंगोणे बु. येथे झुडपांमध्ये आढळले अर्भक

धरणगाव पोलीसात संपर्क साधण्याचे आवाहन
हिंगोणे बु. येथे झुडपांमध्ये आढळले अर्भक

हिंगोणे बु., ता. धरणगाव - Dharngaon

धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बु. येथे आज झाडा झुडपांमध्ये स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली. या नवजात अर्भकाचा रडण्याचा आवाज आल्याने ग्रामस्थांनी धावत घेत या अर्भकास याठिकाणी कुणीतरी सोडून गेल्याचे निदर्शनास आले.

आढळून आलेले हे अर्भक तीन-चार दिवसांचे असल्याचे बोलले जात आहे. ते कुणाचे आहे याबाबत मात्र समजले नसून स्त्री जातीचे असल्याने ‘नकोशी’झाली का? अनैतिक संबंधातून जन्माला आले? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

ग्रामस्थांनी याबाबतची माहिती धरणगाव पोलीसात कळवली असून अर्भकास पोलींसाच्या स्वाधीन केले आहे. याबाबत माहिती असल्यास त्वरीत धरणगाव पोलीसात संपर्क साधावा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com