रस्त्यावरील ॲन्टीजन टेस्टमध्ये आढळले १३३ कोरोनाबाधित

रस्त्यावरील ॲन्टीजन टेस्टमध्ये आढळले १३३ कोरोनाबाधित

जिल्हयात तीन दिवसात विनाकारण फिरणार्‍या २६९७ जणांची तपासणी

जळगाव - Jalgaon

शहरासह जिल्ह्यात १३ एप्रिलपासून रात्री संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणार्‍यांची रस्त्यावरच ॲन्टीजन टेस्ट करण्याची मोहिम पोलीस दलाकडून राबविली जात आहे.

तीन दिवसाच्या या मोहिमेत जिल्हयात एकूण विनाकारण फिरणार्‍या २ हजार ६९७ जणांची ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात १३३ नागरीक पॉझिटीव्ह आढहून आल्याने त्यांनी कोवीड रूग्णालयात पाठविण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी दिली आहे. दरम्यान ही कारवाई आता दिवसाही राबविण्यात यावी अशी मागणी होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com