भुसावळ : आयुध निर्माणी मुख्य गेटवर सरकार विरोधी प्रदर्शन
जळगाव

भुसावळ : आयुध निर्माणी मुख्य गेटवर सरकार विरोधी प्रदर्शन

कामगार विरोधी धोरणाचा विरोध

Rajendra Patil

भुसावळ - प्रतिनिधी

आयुध निर्माणी भुसावळ येथे एनडीए प्रेरित बीजेपी सरकार द्वारा घेतला गेलेला आयुध निर्माणी निगमिकरण निर्णय रद्द करणे व सातत्याने होत असलेले कामगार विरोधी धोरणाचे विरोधात एकत्र येऊन प्रदर्शन करीत आहेत.

देशातील केंद्रीय कर्मचारी महासंघाचे आदेशानुसार दि.३ जुलै देशव्यापी विरोध दिवस सर्वच कामगार क्षेत्रात साजरा करणार आहेत. संरक्षण क्षेत्रातील अग्रणी AIDEF, INDWF, BPMS यांच्या राष्ट्रीय स्तरावर स्थापित संयुक्त संघर्ष समिति चे आदेशानुसार देशातील ४१ आयुध निर्माणीतुन दि.३ जुलैला राष्ट्रीय विरोध दिवस साजरा केला जाणार आहे.

त्याला सफल करण्यासाठी स्थानिक संयुक्त संघर्ष समितीद्वारे दि.१ जुलै पासुनच आंदोलनास सुरवात केली असुन दि.३ जुलैला विशाल प्रदर्शन सफल करण्याचे निश्चित झाले आहे. सर्व निर्माणी कर्मचारी मेन गेटवर विरोध प्रदर्शन करून सरकारचे लक्ष वेधुन, सरकारचा कर्मचारी विरोधी धोरणाचा विरोध दर्शवतील.

यशस्वीतेसाठी स्थानिक संयुक्त संघर्ष समिति चे नवल भिडे, किशोर पाटील, एम.एस.राऊत, किशोर चौधरी, लक्ष्मण वाघ, किशोर पाटील, विजु साळुंखे, सूर्यभान गाढे, विजय साळुंके, संजय अहिरे सह सर्व पदाधिकारी प्रयत्न आहेत. सच्चानंद गोधवानी, प्रकाश कदम व संयोजक दिनेश राजगिरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com