जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी करोना पॉझिटिव्ह 345 रुग्ण
जळगाव

जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी करोना पॉझिटिव्ह 345 रुग्ण

224 रुग्णांना डिस्चार्ज ; एकूण रुग्ण संख्या 12 हजार 381

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह 345 रुग्ण आढळले.जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 12 हजार 381 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 40, जळगाव ग्रामीणमधील 11, भुसावळ येथील 9, अमळनेरातील 31, चोपडा येथील 22, पाचोरा येथील 44, भडगावातील 77, धरणगाव येथील 17, यावल येथील 3, जामनेरातील 29, रावेर येथील 7, पारोळा येथील 15, चाळीसगावातील 14, मुक्ताईनगरातील 14 व परजिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 693 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 224 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 3 हजार 124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण 564 रुग्ण दगावले. यातील 15 रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात 7, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात 5, गोल्डसिटी हॉस्पिटलमध्ये 1, चिन्मय हॉस्पिटल येथे 1, अमळनेर येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये जळगाव शहरातील 55, 70, 80, 86 वर्षीय पुरुष, 87 वर्षीय महिला, रावेर तालुक्यामधील 59 व 70 वर्षीय पुरुष, चोपडा तालुक्यामधील 79 वर्षीय पुरुष, भुसावळ तालुक्यामधील 68 वर्षीय पुरुष, भडगाव तालुक्यातील 60 वर्षीय महिला, धरणगाव तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, अमळनेर तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष, चाळीसगाव तालुक्यामधील 77 वर्षीय पुरुष, जामनेर तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष, जळगाव तालुक्यामधील 77 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com