जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी करोना पॉझिटिव्ह 261 रुग्ण
जळगाव

जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी करोना पॉझिटिव्ह 261 रुग्ण

एकूण रुग्ण संख्या 6654 ; 9 रुग्णांचा मृत्यू

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह 261 रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 6654 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 84, जळगाव ग्रामीणमधील 5, भुसावळ येथील 14, अमळनेरातील 9, चोपड्यामधील 40, पाचोरा येथील 3, भडगावातील 5, धरणगावातील 16, यावलमधील 11, एरंडोल येथील 2, जामनेरातील 11, रावेर येथील 19, पारोळ्यामधील 2, चाळीसगावातील 9, मुक्ताईनगरामधील 24, बोदवड येथील 1 आणि परजिल्ह्यातील 6 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात बुधवारी 121 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 4008 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 2294 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 151 रुग्ण अत्यवस्थ आहे. जिल्ह्यात एकूण 352 रुग्ण दगावले आहेत.

तर 9 रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात 7, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. मृतांमध्ये जळगाव शहरातील 55 वर्षीय, 52 वर्षीय पुरुष, 60 व 55 वर्षीय महिला, चोपडा तालुक्यातील 54 वर्षीय पुरुष व महिला, पाचोरा तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यामधील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com