जिल्ह्यात आढळले आणखी कोरोना पॉझिटिव्ह ६०१ रुग्ण
जळगाव

जिल्ह्यात आढळले आणखी कोरोना पॉझिटिव्ह ६०१ रुग्ण

एकूण रुग्ण संख्या १८ हजार २९७

Ramsing Pardeshi

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात रविवारी कोरोना पॉझिटिव्ह ६०१ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १८ हजार २९७ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील १२९, जळगाव ग्रामीणमधील ६८, भुसावळमधील १३, अमळनेरातील ८२, चोपडा येथील ४१, पाचोर्‍यातील २३, भडगावमधील २७, धरणगावातील २९, यावलमधील ८, एरंडोल येथील ४२, जामनेरातील ४, रावेर येथील ९, पारोळ्यातील ३२, चाळीसगाव येथील ५७, मुक्ताईनगरातील २१, बोदवड येथील १२, परजिल्ह्यातील ४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ४४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यात ३४३ रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या ५ हजार १९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ६६३ रुग्ण दगावले. यातील १२ रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात २, चाळीसगाव येथे १, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ५, गोल्डसिटी हॉस्पिटलमध्ये १, अमळनेरात २, चोपडा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये भुसावळ तालुक्यातील ५७, ६८, ७८ वर्षीय पुरुष, चाळीसगाव तालुक्यामधील ६१ व ६८ वर्षीय पुरुष, अमळनेर तालुक्यामधील ७० व ७५ वर्षीय महिला, जळगाव शहरातील ७० वर्षीय महिला, धरणगाव तालुक्यामधील ६२ वर्षीय पुरुष, पाचोरा तालुक्यामधील ४० वर्षीय महिला, चोपडा तालुक्यातील ५३ वर्षीय महिला, मुक्ताईनगर तालुक्यामधील ३८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

या अगोदर आढळले ५६५ रुग्ण

जिल्ह्यात १५ रोजी कोरोना पॉझिटिव्ह ५६५ रुग्ण आढळले आहे. यात सर्वाधिक १३८ रुग्ण जळगाव शहरात आढळले. या रुग्णांमध्ये जळगाव ग्रामीणमधील ३८, भुसावळमधील २६, पाचोरा येथील ५, भडगाव येथील ५०, धरणगावातील २९, यावल येथील १९, एरंडोलमधील २९, जामनेर-येथील ११, रावेरातील ६, पारोळा येथील ३२, चाळीसगाव येथील ३८, मुक्ताईनगरातील १३, बोदवड येथील ३ आणि परजिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com