जिल्ह्यात आढळले आणखी करोना पॉझिटिव्ह ५७१  रुग्ण
जळगाव

जिल्ह्यात आढळले आणखी करोना पॉझिटिव्ह ५७१ रुग्ण

एकूण रुग्ण संख्या १५ हजार ९६२

Pankaj Pachpol

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह ५७१ रुग्ण आढळले. यात सर्वाधिक १४१ रुग्ण जळगाव शहरातील आहेत. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १५ हजार ९६२ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगावातील १४१, जळगाव ग्रामीणमधील ४७, भुसावळमधील २८, अमळनेर येथील १७, चोपडा येथील ५६, पाचोरा येथील १४, भडगावातील ९, धरणगावमधील ४०, यावल येथील १७, एरंडोल येथील १७, जामनेरमधील ३०, रावेर येथील १६, पारोळ्यातील ३०, चाळीसगाव येथील ७८, मुक्ताईनगर येथील २१, परजिल्ह्यातील १० रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात १० हजार ९८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील ३०१ रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ४ हजार ३५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६२७ रुग्ण दगावले. यातील ८ रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात २, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ५, तर चोपडा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये भुसावळ तालुक्यातील ५३ व ६२ वर्षीय महिला, चोपडा तालुक्यामधील ७० वर्षीय पुरुष, पाचोरा तालुक्यातील ६४ वर्षीय पुरुष, अमळनेर तालुक्यामधील ७४ वर्षीय महिला, जळगाव तालुक्यातील ३५ वर्षीय पुरुष, चाळीसगाव तालुक्यामधील ४५ वर्षीय पुरुष, भडगाव तालुक्यातील ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com