धक्कादायक : जिल्ह्यात आढळले आणखी ४८७ पॉझिटिव्ह  रुग्ण
जळगाव

धक्कादायक : जिल्ह्यात आढळले आणखी ४८७ पॉझिटिव्ह रुग्ण

१९९ रुग्णांना डिस्चार्ज ; रुग्णांची संख्या आता १३ हजार ५७४

Pankaj Pachpol

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळणार्‍या रुग्णांमध्ये धक्कादायक अशी वाढ झाली आहे. शुक्रवारी जिल्हयात ४८७ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १३ हजार ५७४ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील ९९, जळगाव ग्रामीणमधील ३१, भुसावळ येथील २३, अमळनेरातील ३२, चोपडा येथील ४५, पाचोरा येथील ८, धरणगावातील १७, यावल येथील ९, एरंडोल येथील ७९, जामनेरातील २८, रावेरमधील ६, पारोळ्यातील ३४, चाळीसगावातील २६, बोदवड येथील ४, परजिल्ह्यातील ३ रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार ३४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर १९९रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ३ हजार ६३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण ५९२ रुग्ण दगावले. तर ८ रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात ४, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात २, गोल्ड सिटी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जळगाव शहरातील ६८ वर्षीय पुरुष, अमळनेर तालुक्यातील ७८ वर्षीय पुरूष ,पारोळा तालुक्यातील ५६ वर्षीय महिला, चाळीसगाव तालुक्यामधील ७४ वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यातील ७८ वर्षीय पुरूष, यावल तालुक्यातील ७४ वर्षीय पुरूष,पाचोरा तालुक्यातील ५६ वर्षीय पुरूष, चोपडा तालुक्यातील ७० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com