जळगावात तब्बल  ४१८ पॉझिटिव्ह रुग्ण
जळगाव

जळगावात तब्बल ४१८ पॉझिटिव्ह रुग्ण

जळगावात तब्बल १२१ रुग्ण ; एकूण रुग्ण संख्या ८६०५

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह ४१८ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ८६०५ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील १२१, जळगाव ग्रामीणमधील १२, भुसावळ येथील २९, अमळनेरातील १५, चोपडा येथील ४५, पाचोरा येथील १८, भडगावमधील २, धरणगावातील २५, यावल येथील १६, एरंडोलमधील १०, जामनेर येथील ३८, रावेर येथील ३३, पारोळ्यातील ५, चाळीसगाव येथील ४४, मुक्ताईनगरातील २, बोदवड येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ५४७० रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर २१९ रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या २७०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ३३८ रुग्ण अत्यवस्थ आहे. जिल्ह्यात एकूण ४२७ रुग्ण दगावले. यातील १२ रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात ९, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात २, तर चोपडा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com