आणखी 385 पॉझिटिव्ह रुग्ण
जळगाव

आणखी 385 पॉझिटिव्ह रुग्ण

एकूण रुग्ण संख्या 12 हजार 766

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह 385 रुग्ण आढळले.जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 12 हजार 766 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 73, जळगाव ग्रामीणमधील 14, भुसावळ येथील 18, अमळनेरातील 38, चोपडा येथील 32, पाचोरा येथील 32, भडगावातील 7, धरणगावमधील 38, यावलमधील 4, एरंडोल येथील 71, जामनेरातील 32, रावेर येथील 3, पारोळ्यातील 4, चाळीसगावमधील 15, बोदवड येथील 2, परजिल्ह्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 945 रुग्ण कोरोनामुक्त झाले.. तर 252 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 3 हजार 245 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण 576 रुग्ण दगावले. यातील 12 रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात 2, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात 6, मयत स्थितीत दाखल 2, चोपडा येथे 2 रुग्णांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये जळगाव शहरातील 57, 78, 80 वर्षीय महिला, जळगाव तालुक्यातील 57, 80 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, रावेर तालुक्यातील 50, 62 व 70 वर्षीय पुरुष, चोपडा तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष आणि 72 वर्षीय महिला, धरणगाव तालुक्यातील 82 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com