जिल्ह्यात आढळले आणखी करोना पॉझिटिव्ह ३६५ रुग्ण
जळगाव

जिल्ह्यात आढळले आणखी करोना पॉझिटिव्ह ३६५ रुग्ण

एकूण रुग्ण संख्या ११ हजार ७५३

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात रविवारी कोरोना पॉझिटिव्ह ३६५ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ११ हजार ७५३ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील ९२, जळगाव ग्रामीणमधील २९, भुसावळ येथील २८, अमळनेरातील २९, चोपडा येथील ४५, पाचोरा येथील ३०, भडगावातील १५, धरणगावमधील ७, यावल येथील ७, एरंडोल येथील ४, जामनेरातील १६, रावेर येथील १५, पारोळ्यातील ८, चाळीसगावमधील ३४, बोदवड येथील ५, परजिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार २०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

यातील ३६२ रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ३ हजार १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण ५४० रुग्ण दगावले.

१३ रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात ७, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात १, गोल्डसिटी हॉस्पिटलमध्ये ३, रुबी हॉस्पिटलमध्ये ३, अमळनेर येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जळगाव शहरातील ३४, ३९, ४४, ४५, ८९ वर्षीय पुरुष, ७८ वर्षीय महिला, पाचोरा तालुक्यामधील ७३ वर्षीय पुरुष, ७२ वर्षीय महिला, अमळनेर तालुक्यातील ७५ वर्षीय पुरुष, एरंडोल तालुक्यामधील ७५ वर्षीय पुरुष, जळगाव तालुक्यातील ६१ वर्षीय महिला, मुक्ताईनगर तालुक्यातील ७५ वर्षीय महिला, धरणगाव तालुक्यातील ७२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com