दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रुग्णसंख्या पुन्हा ३०० पार
जळगाव

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रुग्णसंख्या पुन्हा ३०० पार

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह ३४२ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १० हजार ५९१ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील ६१, जळगाव ग्रामीणमधील १६, भुसावळ येथील २०, अमळनेरातील २३, चोपडा येथील २२, पाचोरा येथील ४४, भडगावातील ९, धरणगाव येथील १६, यावल येथील १६, एरंडोल येथील २२, जामनेरातील १९, रावेर येथील १०, पारोळ्यातील ३, चाळीसगावमधील २८, मुक्ताईनगरातील १५, बोदवडमधील १५, परजिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ७०१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यात २८० रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ३०८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण ४९३ रुग्ण दखावले. १२ रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला.

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ५, अमळनेर येथे २ रुग्णांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये जळगाव शहरातील ५५ व ५४ वर्षीय पुरुष, अमळनेर तालुक्यातील ६८ व ४५ वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय महिला, चाळीसगाव तालुक्यामधील ७० वर्षीय पुरुष व ७५ वर्षीय महिला, पाचोरा तालुक्यामधील ५२ वर्षीय महिला, चोपडा तालुक्यातील ५५ वर्षीय महिला, रावेर तालुक्यामधील ५५ वर्षीय महिला, जामनेर तालुक्यामधील ६७ व ८४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com