जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ हजार ८७
जळगाव

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ हजार ८७

आणखी आढळले ३२१ करोना रुग्ण

Pankaj Pachpol

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह ३२१ रुग्ण आढळले.जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १३ हजार ८७ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील ७९, जळगाव ग्रामीणमधील १२, भुसावळ येथील १९, अमळनेरातील १५, चोपडा येथील २०, पाचोरा येथील १८, धरणगावातील १८, यावल येथील ९, एरंडोल येथील ५१, जामनेरातील १५, रावेरमधील ६, पारोळ्यातील ३, चाळीसगावातील १८, मुक्ताईनगरातील ३६, बोदवड येथील १, परजिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार १४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर २०० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ३ हजार ३५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण ५८४ रुग्ण दगावले. तर ८ रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात २, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ५, गोल्ड सिटी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये जळगाव तालुक्यातील ३५ वर्षीय पुरुष, चाळीसगाव तालुक्यामधील ८० व ८३ वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यातील ७० वर्षीय महिला, धरणगाव तालुक्यामधील ६० व ६५ वर्षीय महिला, पाचोरा तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष, एरंडोल तालुक्यातील ८२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com