जळगाव जिल्ह्यात आढळले आणखी कोरोना पॉझिटिव्ह ३१३ रुग्ण
जळगाव

जळगाव जिल्ह्यात आढळले आणखी कोरोना पॉझिटिव्ह ३१३ रुग्ण

एकूण रुग्ण संख्या १३ हजार ८८७९ रुग्णांचा मृत्यू; २४४ रुग्णांना डिस्चार्ज

Ramsing Pardeshi

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह ३१३ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १३ हजार ८८७ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील ६८, जळगाव ग्रामीणमधील १२, भुसावळ येथील १४, अमळनेरातील ५३, चोपडा येथील २६, पाचोरा येथील ३, भडगावातील २६, धरणगावमधील १२, यावल येथील १४, जामनेरातील २६, रावेर येथील २१, पारोळ्यातील १६, चाळीसगाव येथील ४, मुक्ताईनगरातील १२, बोदवड येथील १, परजिल्ह्यातील ५ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात ९५८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील २४४ रुग्णांना नुुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ३ हजार ६९८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. एकूण ६०१ रुग्ण दगावले आहेत. यातील ९ रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात ३, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात २, रुबी हॉस्पिटलमध्ये १, चोपडा येथे २ व अमळनेर येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जळगाव तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष, चोपडा तालुक्यामधील ६५ व ७३ वर्षीय पुरुष, भुसावळ येथील ५५ व ६५ वर्षीय पुरुष, अमळनेर तालुक्यातील ४८ वर्षीय पुरुष, एरंडोल तालुक्यामधील ४२ वर्षीय पुरुष, चाळीसगाव तालुक्यातील ७५ वर्षीय पुरुष, पाचोरा तालुक्यामधील ५६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com