जळगाव जिल्ह्यात आढळले आणखी २८५ करोना बाधीत
जळगाव

जळगाव जिल्ह्यात आढळले आणखी २८५ करोना बाधीत

९ रुग्णांचा मृत्यू ; २८४ रुग्णांना डिस्चार्ज

Pankaj Pachpol

जळगाव - Jalgaon

जिल्ह्यात शनिवारी करोना पॉझिटिव्ह २८५ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ११ हजार ३८८ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील ७५, जळगाव ग्रामीणमधील १८, भुसावळ येथील १२, अमळनेरातील १६, चोपडा येथील २०, पाचोरा येथील २३, भडगावातील ११, धरणगावातील २५, यावल येथील १, जामनेरमधील ३५, रावेरातील ९, पारोळ्यातील ६, चाळीसगाव येथील २७, मुक्ताईनगरातील ६, परजिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ८४१ रुग्ण करोनामुक्त झाले. यातील २८४ रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ३ हजार २० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण ५२७ रुग्ण दगावले. यातील ९ रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला आहे. यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात ६, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात २, गोल्ड सिटी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जळगाव शहरातील ४५, ६०, ७३ वर्षीय पुरुष आणि ४६ वर्षीय महिला, जळगाव तालुक्यातील ८० वर्षीय पुरुष, अमळनेर तालुक्यामधील ५५ वर्षीय पुरुष व ४२ वर्षीय महिला, एरंडोल तालुक्यामधील ७८ वर्षीय पुरुष, यावल तालुक्यातील ६६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com