जिल्ह्यात आढळले आणखी करोना पॉझिटिव्ह २८१ रुग्ण
जळगाव

जिल्ह्यात आढळले आणखी करोना पॉझिटिव्ह २८१ रुग्ण

एकूण रुग्ण संख्या ९७३२ ; २४८ रुग्णांना डिस्चार्ज

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात रविवारी कोरोना पॉझिटिव्ह 281 रुग्ण आढळले.जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 9732 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरात 88, जळगाव ग्रामीण भागात 22, भुसावळमधील 21, अमळनेरातील 9, चोपडा येथील 22, पाचोरा येथील 14, भडगावातील 9, धरणगावमधील 2, यावल येथील 7, एरंडोलमधील 27, जामनेरातील 16, रावेर येथील 12, पारोळ्यातील 2, चाळीसगाव येथील 11, मुक्ताईनगरातील 17, परजिल्ह्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 6291 रुग्ण बरे झाले आहेत. त्यातील 248 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 2974 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण 469 रुग्ण दगावले. यात 7 रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. तसेच 85 रुग्णांना होम आयसोलेशन (पॉझिटिव्ह रुग्ण) केले आहे.

जिल्ह्यातील 7 रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 1, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात 4, गोल्ड सिटी हॉस्पिटलमध्ये 1, भडगाव ग्रामीण रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जळगाव तालुक्यातील 75 वर्षीय एक वृद्ध, पाचोरा तालुक्यामधील 48 व 78 पुरुष, चोपडा तालुक्यामधील 61 वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यामधील 55 वर्षीय महिला, चाळीसगाव तालुक्यातील 65 वर्षीय महिला, भडगाव तालुक्यामधील 58 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com