जिल्ह्यात आढळले आणखी २६७ पॉझिटिव्ह रुग्ण
जळगाव

जिल्ह्यात आढळले आणखी २६७ पॉझिटिव्ह रुग्ण

एकूण रुग्ण संख्या १० हजार ८५८

Pankaj Pachpol

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह २६७ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १० हजार ८५८ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील ८६, जळगाव ग्रामीणमधील २३, भुसावळ येथील ८, अमळनेरातील ४, चोपडा येथील १६, पाचोरा येथील १८, भडगावातील ७, धरणगावमधील ९, यावल येथील १२, एरंडोल येथील ५, जामनेरातील ३४, रावेर येथील २, पारोळ्यामधील १५, चाळीसगावातील २८ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ७२८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २७१ रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ३०६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण ५०६ रुग्ण दगावले. यात १३ रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात ७, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ५, चिन्मय हॉस्पिटलमध्ये १ आणि चोपडा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये जळगाव शहरातील ७२ व ७५ वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय महिला, अमळनेर तालुक्यामधील ४२ व ५० वर्षीय पुरुष, यावल तालुक्यातील २९ आणि ४६ वर्षीय पुरुष, जळगाव तालुक्यातील ६० व ७२ वर्षीय महिला, पाचोरा तालुक्यातील ८३ वर्षीय महिला, चोपडा तालुक्यामधील ७० वर्षीय पुरुष, पारोळा तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यामधील ६० पुरुषाचा समावेश आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com