जिल्ह्यात आढळले आणखी २४५ रुग्ण
जळगाव

जिल्ह्यात आढळले आणखी २४५ रुग्ण

एकूण रुग्ण संख्या ११ हजार १०३

Pankaj Pachpol

जळगाव - Jalgaon :

जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह २४५ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ११ हजार १०३ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील ५७, जळगाव ग्रामीणमधील १७, भुसावळ येथील १३, अमळनेरातील २८, चोपडा येथील २६, पाचोरा येथील ४, भडगावातील १२, धरणगाव येथील ३, यावल येथील २, एरंडोल येथील १, जामनेरातील ३०, रावेर येथील २, पारोळ्यातील ५, चाळीसगावमधील २९, मुक्ताईनगरातील १०, बोदवडमधील ५, परजिल्ह्यातील १ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ७५५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यात २७० रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ३०२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण ५१८ रुग्ण दखावले. १२ रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ४, मुक्ताईनगर येथे १, २ विघ्नहर्ता हॉस्पिटल पाचोरा येथे मृत्यू झाला.

मृतांमध्ये जळगाव शहरातील ६० वर्षीय पुरुष आणि ५९ व ६६ वर्षीय महिला, रावेर तालुक्यातील ६५ व ६९ वर्षीय पुरुष, चाळीसगाव तालुक्यातील ८६ व ७७ वर्षीय पुरुष, अमळनेर तालुक्यातील ७४ वर्षीय पुरुष, यावल तालुक्यातील ६३ वर्षीय पुरुष, पाचोरा तालुक्यातील ६५ वर्षीय महिला, भुसावळ तालुक्यातील ५४ वर्षीय पुरुष व पारोळा तालुक्यातील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com