जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी पॉझिटिव्ह २४४ रुग्ण
जळगाव

जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी पॉझिटिव्ह २४४ रुग्ण

एकूण रुग्ण संख्या ८८४९ ; १६० रुग्णांना डिस्चार्ज

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह २४४ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ८८४९ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील ४२, जळगाव ग्रामीणमधील ९, भुसावळ येथील १४, अमळनेरातील ८, चोपडा येथील ७, पाचोर्‍यातील २, भडगावमधील १५, धरणगावातील ३, यावल येथील २२, एरंडोलमधील ४३, जामनेरातील २१, रावेर येथील १२, पारोळ्यातील १६, चाळीसगाव येथील १२, मुक्ताईनगरातील ९, बोदवड येथील १ आणि परजिल्ह्यातील २ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ५६३० रुग्ण कोरोनामुक्त झाले. यात १६० रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात सध्या २७७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ३१८ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. विविध ठिकाणचे एकूण ४४० रुग्ण दगावल. यातील १३ रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला.

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात ११ रुग्ण, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात २ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जळगाव शहरातील ४५, ४९, ५६, ६०, ६७ वर्षीय पुरुष व ४५ वर्षीय महिला, एरंडोल तालुक्यातील ७५ वर्षीय पुरुष व ८४ वर्षीय महिला, यावल तालुक्यातील ५० व ८५ वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यातील ४९ वर्षीय पुरुष, पाचोरा तालुक्यातील ५७ वर्षीय पुरुष, जामनेर तालुक्यामधील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.०

Deshdoot
www.deshdoot.com