जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी पॉझिटिव्ह १८३ रुग्ण
जळगाव

जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी पॉझिटिव्ह १८३ रुग्ण

एकूण रुग्ण संख्या ८१८७

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon प्रतिनिधी :

जिल्ह्यात मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह १८३ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ८१८७ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील ३९, जळगाव ग्रामीणमधील १२, भुसावळ येथील ६, अमळनेरातील ४, चोपडा येथील २५, पाचोर्‍यातील २०, धरणगावातील १३, यावलमधील ४, एरंडोल येथील ३, जामनेर व रावेर येथील प्रत्येकी १२, पारोळ्यातील १३, चाळीसगाव येथील ५, मुक्ताईनगारातील १०, बोदवड येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.२०० रुग्णांना डिस्चार्जजिल्ह्यात ५२५१ रुग्ण रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील २०० रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.

जिल्ह्यात सध्या २५२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ३३१ रुग्ण अत्यवस्थ आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१५ रुग्ण दगावले. यातील १५ रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात ७, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ४, गोल्ड सिटी हॉस्पिटलमध्ये १, चिन्मय हॉस्पिटलमध्ये १, तसेच चोपडा व पाचोरा येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com