जिल्ह्यात आढळले आणखी कोरोना बाधित १७० रुग्ण; एकूण रुग्ण संख्या ३४३८

जिल्ह्यात आढळले आणखी कोरोना बाधित १७० रुग्ण; एकूण रुग्ण संख्या ३४३८

नऊ रुग्णांचा मृत्यू ; १५० रुग्णांची प्रकृती चिंताजनक

जळगाव - जिल्ह्यात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह 170 रुग्ण आढळले. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 3438 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 23, जळगाव ग्रामीणमधील 5, भुसावळ येथील 8, चाळीसगावातील 2, एरंडोल येथील 20, पाचोरा येथील 4, यावलमधील 14, भडगावातील 43, चोपडा येथील 3, जामनेर येथील 9, पारोळ्यातील 1, अमळनेर येथील 15, धरणगावातील 12, रावेर येथील 7 रुग्णांचा समावेश आहे. रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या 1100 रुग्ण उपचार घेत आहेत. यातील 150 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यामध्ये सोमवारी 101 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एकूण 2014 रुग्ण कोरोनामुक्त झाले. नऊ रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 234 रुग्ण दगावले आहेत.

जिल्ह्यात 9 रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 5 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात तीन रुग्ण आणि एका रुग्णाचा मृत्यू बाहेरील जिल्ह्यात झाला आहे. या मृतांमध्ये चाळीसगाव तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष, जळगाव तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष, भुसावळ तालुक्यामधील 75 वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यातील 60 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, चोपडा तालुक्यातील 75 वर्षीय दोन महिला, पारोळा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com