जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी करोना पॉझिटिव्ह १४४ रुग्ण
जळगाव

जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी करोना पॉझिटिव्ह १४४ रुग्ण

एकूण रुग्ण संख्या ३५८३१० रुग्णांचा मृत्यू; १७३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक

Balvant Gaikwad

जळगाव - प्रतिनिधीजिल्ह्यात मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह १४४ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ३५८२ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील २४, जळगाव ग्रामीणमधील ५, भुसावळ येथील १, चाळीसगावमधील ४, एरंडोल येथील १, पाचोरा येथील ४, यावल येथील १९, भडगावातील १९, चोपडा येथील ११, जामनेर येथील ११, पारोळा येथील ८, अमळनेरातील २, बोदवड येथील ७, धरणगावमधील ६, मुक्ताईनगरातील ९, रावेर येथील १३ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या पॉझिटिव्ह १२२८ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यामध्ये मंगळवारी ९७ रुग्ण , तर आतापर्यंत एकूण २१११ रुग्ण बरे झाले. विविध ठिकाणी १० रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. तर आतापर्यंत एकूण २४४ रुग्ण दगावले आहेत. १७३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

विविध ठिकाणी १० रुग्णांचा मृत्यू झाला. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात ४, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात ५ आणि गणपती हॉस्पिटल कोविड सेंटरमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला. या मृतांंमध्ये जामनेर तालुक्यातील ६५ वर्षीय दोन व एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

जळगाव शहरातील ५५ वर्षीय एक पुरुष, भुसावळ तालुक्यातील ५० आणि ६६ वर्षीय पुरुष, यावल तालुक्यातील ५८ वर्षीय महिला व ४० वर्षीय पुरुष, धरणगाव तालुक्यातील ८५ वर्षीय महिला, एरंडोल तालुक्यामधील ५५ वर्षीय एका पुरुषाचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com