<p><strong>रावेर|प्रतिनिधी Raver</strong></p><p>येथील पोलीस स्टेशनमध्ये वार्षिक तपासणी पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी सुरू केली आहे. सकाळी ११ वा. रावेर पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या पोलीस अधीक्षकांना मानवंदना देण्यात आली.</p>.<p>त्यानंतर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांचे पथकांचे निरीक्षण करताना कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. मुद्देमाल रूम, लॉकअप, महिला लॉकअप, गोपनीय विभाग यासह पोलीस स्टेशन इमारतीची पाहणी केली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सपोनि शीतलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, मनोहर जाधव उपस्थित होते.</p>