लॉकडाऊनने आणले जरी लाख बंधन, आण्णाभाऊ साठेंना घरातच केले वंदन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन
लॉकडाऊनने आणले जरी लाख बंधन, आण्णाभाऊ साठेंना घरातच केले वंदन

धरणगाव - प्रतिनिधी - Dharangaon

सध्या करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामुदायिक कार्यक्रमांना बंदी आहे. लोकंही सुरक्षा पाळत आहेत. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनने बंधनं आणलेली असतांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी त्यांच्यावर निखळ प्रेम करणाऱ्यांनी घरीच साजरी केली.

धरणगाव
धरणगाव

येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील कर्मचारी संजय तोडे यांनी आण्णाभाऊ साठे यांचे स्मरण करुन घरीच सहपरीवार त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. मनात श्रदाभाव असेल तर कोणतिही आपत्ती आपल्या श्रध्दास्थानापासून आपल्याला दूर करु शकत नाही हे सांगणारी ही घटना आहे. कुणी हे केलं नाही, कुणी ते केलं नाही ही खंत करत बसण्यापेक्षा आपण काय करु शकतो ते करावे हा संदेशच तोडे यांनी या छोट्याशा उपक्रमातून दाखवून दिले आहे.

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त आपल्या घरीच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पत्नी, आई वडिला सोबत संजय तोडे यांनी आपल्या श्रध्दास्थानाला विनम्र अभिवादन केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com