पाळधीजवळ रेल्वेसमोर झोकून देत वृध्देची आत्महत्या

ओळख पटविण्याचे आवाहन
पाळधीजवळ रेल्वेसमोर झोकून देत वृध्देची आत्महत्या

जळगाव Jalgaon

धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत वृध्द महिलेने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव-पाळधी दरम्यानातील रेल्वे रूळावर घडली. अद्याप महिलेची ओळख पटलेली नसून पोलीस नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

जळगाव- पाळधी रेल्वे रूळावरील खांबा क्रमांक ३०१ ते १४ च्या दरम्यानात शनिवारी सकाळी वृध्द महिलेने धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून दिले. यात वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाळधी स्टेशन अधीक्षक मोहम्मद हुसेन अब्दूल रौफ यांना कळताच, त्यांनी याबाबत तालुका पोलिसांना खबर दिली. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस

कर्मचारी सतिष हाळणोर यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. नंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, महिलेजवळ ओळख पटेल असे काही पोलिसांना आढळून आलेले नाही. त्यामुळे ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे. पुढील तपास सतिष हाळणोर करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com