अधिकार्‍यांसह १५० पोलीस कर्मचार्‍यांचा फौजफाटा रस्त्यावर

अधिकार्‍यांसह १५० पोलीस कर्मचार्‍यांचा फौजफाटा रस्त्यावर

दुचाकी चोरीच्या पार्श्‍वभूमिवर कारवाई ; ४८ संशयास्पद वाहने ताब्यात

जळगाव - Jalgaon

शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या घटनांच्या पार्श्‍वभूमिवर आज शनिवारी पहाटेच पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह १७ अधिकारी व १४० कर्मचार्‍यांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला.

शहरातीलकांचन नगर, तांबापूरा, गेंदालाल मिली, पिंप्राळा हुडको, शिवाजीनगर हुडको, शनीपेठ परिसर, मास्टर कॉलनी, सुप्रिम कॉलनी या भागांमध्ये वाहनांसह रेकॉर्डवरील संशयितांची तपासणी करण्यात आली.

या कारवाईत एकूण ४१६ वाहनाची तपासणी करण्यात येवून कागदपत्रे नसलेली संशयास्पद २८ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. तसेच रेकार्डवरील २४ संशयितांची तसेच हद्दपार ११ संशयितांची तपासणी करण्यात आली. यात एक हद्दपार आरोपी मिळून आला असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com