काळ्या कॅनव्हासवर साकारली विठुरायाची अप्रतिम प्रतिमा

काळ्या कॅनव्हासवर साकारली विठुरायाची अप्रतिम प्रतिमा

चित्रकार कादंबरी चौधरीच्या या कलेचे होतेय कौतुक

जळगाव - Jalgaon

विठुराया हे संपूर्ण महाराष्ट्राचं (Maharashtra) आराध्य दैवत असून, हिंदू धर्मातील वैष्णव पंथांचे प्रमुख दैवत आहे...! वारकरी सांप्रदायाचा तर विठ्ठल (Vitthal) म्हणजे जीव की प्राण....! संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या आराधनेत अक्षरशः तल्लीन होऊन जातो व जीवनातील सर्व सुख दुःख विसरून विठ्ठलाशी एकरूप होतो. अशाच विठूरायाची प्रतिमा आजवर अनेक कलाप्रेमी यांनी विविध कल्पनांनी साकारली असून, चित्रकार कादंबरी चौधरी (Kadambari Chaudhary) हिने कुठलीही पदवी नसतांना मॅनेजमेंटची विद्यार्थिनी (Management student) असून सुद्धा आषाढी एकादशीच्या औचित्यावर काळ्या कॅनव्हासवर एक अप्रतिम आगळावेगळा विठ्ठल साकारला आहे. कादंबरीने आजपर्यंत बरीच चित्रे रेखाटली त्यातील हे चित्र सगळ्यात सुंदर आहे.

कादंबरीच्या कल्पनेतील विठुराया हा हिरव्या आणि निळ्या रंगांमध्ये अत्यंत आकर्षक रित्या रेखाटला असून, हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे... तसेच निळा रंग हा अगाध व अमर्याद आकाशाचे प्रतीक आहे. Acrylic + Oil या मीडियम मध्ये कादंबरी ने विठोबांचे चित्र रंगविले आहे. या सर्व विश्वात विठुराया कणाकणात निवास करतो, असा त्याचा अर्थ असून विठ्ठलावर श्रद्धा ठेवल्यास प्रत्येकाच्या आयुष्यातील चिंता त्यामुळे दूर होतात...! तिने रेखाटलेले हे चित्र बघताच क्षणी विकले गेले. तिने तिच्या सोशल मीडिया साइट्सवर सुद्धा हे चित्र टाकले आहे अणि कलारसिकांचाही प्रतिसाद तिला मिळाला. कलेची आवड असलेल्या कादंबरीची दोन चित्रे विदेशातही हाँगकाँग व दुबई येथे विकली गेली आहेत, हे उल्लेखनीय.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com