भय इथले, संपत नाही !

सप्ताह घडामोडी : अमोल कासार
भय इथले, संपत नाही !

जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट पुर्णपणे ओसरली आहे. मात्र डेल्टाप्लस व म्युकर मायकोसीसचा धोका अद्याप टळलेला नाही. या दोघ आजारांचा सामना करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानूसार जिल्ह्यात संचारबंदीसह जमावबंदीचे आदेश लागू केले आहे. जळगावकरांकडून या आदेशांची कोटेकोरपणे अंमलबजवणी केली जात आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरणार्‍यांची संख्या देखील बोटावर मोजण्या इतकी असल्याने जळगावकरांना आता मरणाची भिती वाटू लागत असल्याने नागरिक शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करीत असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून करोना महामारीने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम सर्वच घटकांवर झाला असून अनेक सण, उत्सवासह कार्यक्रमांवर देखील बंधणे आली आहे. फेब्रवारी महिन्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले असता संपुर्ण राज्यातील आरोग्य यंत्रणा कामाला लागली होती यात रुग्णालयांमध्ये बेड तर स्मशानभमीत ओटा मिळणे कठीण बनले होते.

या परिस्थितीची जावीण लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक हजार लिटर पर मिनिट क्षमता असलेला पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्रकल्पाचे काम ासरु झाले असून येत्या आठवड्याभरात त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. यातच सद्याच्यास्थितीत नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी केल्याने कोरोनाची दुसरी लाटेला थोपविण्यात जिल्हा प्रशासनासह स्थानिक प्रशासनाला यश आले आहे.

मात्र दुसरी लाट ओसरत नाही तो पर्यंतच राज्यात म्युकर मायकोसीस व डेल्टा व्हेरीयंट प्लस या नवीन विषाणूंचे रुग्ण आढळल्याने पुन्हा प्रशानाची चिंता वाढू लागली. परंतु शाससनाने वेळ न दडवता लागलीच उपायोजनांच्या दृष्टीने तात्काळ जिल्ह्यांमध्ये निर्बंल लागू केले. त्याचा परिणाम बाजारपेठेत होणार्‍या गर्दीसह रुग्णवाढीला ब्रेक लागला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेकडून वारंवार तिसर्‍या लाटेचा धोका सांगितला जात असल्याने नागरिकांमध्ये धडकी भरलेली आहे.

अनेकांनी पहिल्या व दुसर्‍या लाटेत आपले कुटुंबच उद्धवस्थ होतांना बघितल्याने त्यांना कोरोनाची भिती त्यांच्या मनात कायम आहे. त्यामुळे जो पर्यंत देशात शंभर टक्के लसीकरण होणार नाही तो पर्यंत नागरिकांच्या तोंडावरील मास्क व शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करणे अनिवार्य राहणार असल्याचे दिसून येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com