प्राणी, पक्षांवर उपचारासाठी रुग्णवाहिका

अ‍ॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशनतर्फे राज्यातला पहिलाच उपक्रम
प्राणी, पक्षांवर उपचारासाठी रुग्णवाहिका

जळगाव - Jalgaon :

शहरातील रस्त्यांवरिल जखमी मोकाट प्राणी यासह पशुपक्ष्यांना घेऊन जाण्यासह या प्राण्यांवर उपचार करणार्या रुग्णवाहिकेचे पशू अ‍ॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशनतर्फे प्रजासत्ताकदिनी जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौक येथे उद्घाटन करण्यात आले. प्राण्यांसाठी रुग्णवाहिका असलेला हा राज्यातला पहिलाच उपक्रम आहे.

दीड वर्षांपूर्वी जळगाव शहरात पशू अ‍ॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशन या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेतर्फे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते प्राण्यांसाठीच्या राज्यातल्या पहिल्याच अशा रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी इनरव्हील क्लबचे अध्यक्ष मीनल लाठी, प्रीती दोशी यांच्यासह पशू अ‍ॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशनचे अध्यक्ष खुशबु श्रीश्रीमाळ उपाध्यक्ष कोमल श्रीश्रीमाळ सचिव भवानी अग्रवाल अनुप अग्रवाल हर्षल भाटीया डॉ जय राजपूत यांची उपस्थित होती. ओमनी या प्रकारात असलेली ही रूग्णवाहिका संपूर्णपणे तयार करण्यात आलेली आहे.

अशी असणार रुग्णवाहिका

रुग्णवाहिका आवश्यक असे सर्व साहित्य ठेवण्यासह प्राण्यांना ने आण करता येईल या पध्दतीने तयार करण्यात आली आहे.

जखमी प्राणी व पक्षांवर असोसिएशनचे डॉ जय राजपूत हे उपचार करणार आहे प्राण्यांवर तसेच ज्या मोठ्या प्राण्यांना ने आण करणे शक्य होणार नाही त्यांच्यावर रुग्णवाहिकेतून घटनास्थळावर पोहचून आहे त्याच ठिकाणी उपचार केले जाणार आहे.

तसेच सद्य स्थितीत जळगाव शहरात थैमान घालणार्या मोकाट कुत्र्यांवरही या माध्यमातून लसीकरणासह इतर उपाययोजना केली जाणार असल्याचे खुशबु श्रीश्रीमाळ यांनी बोलतांना सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com