दहा किलोमीटरपर्यंत पाचशे रुपये रुग्णवाहिकांचे दर निश्चित

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही
दहा किलोमीटरपर्यंत पाचशे रुपये रुग्णवाहिकांचे दर निश्चित
रुग्णवाहिका

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोना महामारीच्या कठीण काळात प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, जळगावच्या कार्यक्षेत्रात खाजगी कामानिमित्त वापरण्यात येणार्‍या रुग्णवाहिकांसाठी कमाल भाडेदर वाहनाचा प्रकार, सरासरी धाव, चालकाचा भत्ता, घसारा व ग्राहक निर्देशांक विचारात घेऊन निश्चित करण्यात असून दहा किलोमीटरपर्यंत पाचशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत एक हजार रुपये, दर निश्चित करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली आहे.

मारुती व्हॅन, मारुती इको (अवातानुकूलित) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत पाचशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत एक हजार रुपये, तीस किलोमीटरपर्यंत पंधराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी दहा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.

टाटा सुमो व जीपसदृश बांधणी केलेली वाहने (वातानुकूलित) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत सहाशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत बाराशे रुपये, तीस किलोमीटरपर्यंत अठराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी बारा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.

टाटा 407, स्वराज माझदाच्या प्रकारच्या साठ्यावर बांधणी केलेली वाहने (अवातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत सातशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत चौदाशे रुपये, तीस किलोमीटरपर्यंत एकवीसशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी पंधरा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.

आयसीयु (कार्डीओ व्हॅन) (वातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत दोन हजार रुपये, वीस किलोमीटरपर्यंत तीन हजार रुपये, तीस किलोमीटरपर्यंत चार हजार रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी वीस रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.

हे संपूर्ण भाडेदर अंतरानुसार लागू राहतील. या भाड्यापेक्षा कमी अथवा मोफत सेवा देता येवू शकेल, परंतु निश्चित केलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारणी करता येणार नाही. वाहनाच्या तांत्रिक दोषाकरीता वाहनचालक व मालक जबाबदार राहतील.

नमूद भाडे दरपत्रकापेक्षा जादा भाडे आकारणी होत असेल तर संबंधित रुग्णवाहिका वाहनधारकाची तक्रार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, येथे करावी,असेही श्री.लोही यांनी कळविले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com