२० हजाराची लाच घेतांना जि प अभियंता अटकेत

२० हजाराची लाच घेतांना जि प अभियंता अटकेत

स्वच्छ भारत योजनेच्या बिल मंजूरीसाठी मागीतली लाच

अमळनेर - Amalner - प्रतिनिधी :

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधण्याचे बिल तयार करून मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या जि प चे कनिष्ठ अभियंता व वरिष्ठ सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

खेडी प्र अमळनेर येथील स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधण्याचे काम घेतलेल्या पारोळा येथील एक ठेकेदार तरुणाला त्याचे बिल करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अमळनेर उपविभागातील वरिष्ठ सहाय्यक योगेश बापू बोरसे रा प्रताप मिल कंपाऊंड याने १५०० रुपयांची लाच मागितली तर कनिष्ठ अभियंता अरुण जगन्नाथ चव्हाण वय ५७ रा मराठा कॉलनी यांनी बिल मंजूर करण्यासाठी २० हजार रुपये लाच मागितली होती .

मात्र ठेकेदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश लोधी , एएसआय दिनेशसिंग पाटील , सुरेश पाटील , हेकॉ अशोक अहिरे , हेकॉ सुनील पाटील , रवींद्र घुगे ,मनोज जोशी , सुनील शिरसाठ , जनार्धन चौधरी , प्रवीण पाटील , नासिर देशमुख , ईश्वर धनगर , प्रदीप पोळ यांनी सापळा रचला.

२२ रोजी ठेकेदाराने जिल्हा परिषदेच्या उपविभागाच्या सुभाष चौकातील कार्यालयात अभियंत्याला पैसे दिल्यावर ,त्यांनी वरिष्ठ सहाय्यकांचे टायपिंग मेहनतीचे बिल तयार करण्याचे १५०० रुपये द्या असे सांगितले त्यांनाही पैसे देण्यात आले आणि पथकाने रंगेहात पकडले.

तात्काळ दोघे आरोपीना ताब्यात घेऊन पथक जळगाव रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई आणि आरोपींच्या घराची झाडाझडती सुरू होती.

या सारखे काही भ्रष्ट अधिकारी लाचेच्या रडारवर असून नागरिकांची कामे विनाविलंब लाच न करून भ्रष्टाचार थांबवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com