बेपत्ता झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह आढळला
जळगाव

बेपत्ता झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह आढळला

अमळनेर येथील धक्कादायक प्रकार

Rajendra Potdar

अमळनेर - Amalner - प्रतिनिधी :

येथील प्रताप महाविद्यलयातील कोविड सेंटर मधून आज दि१० रोजी सकाळी ८ वाजेपूर्वी गायब झालेला एक ५० वर्षीय पॉझीटीव रूग्णाचा मृतदेह शहरातील पालीकेसमोरील एका दूकानाचे ओट्यावर सायंकाळी मिळून आला.

सदरील व्यक्ती हा तालूक्यातील वावडे येथील सुनिल दिलभर पाटील असल्याचे त्याचे कूटूंबियांनी ओळखले आहे १ महिन्यापूर्वी देखील एक ६० वर्षीय वृध्द असाच कोविड सेंटर मधून गायब होवून दूसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह पारोळ्या जवळ मिळून आला होता.

एकाच महिन्यात कोविड सेंटर मधून रूग्ण गायब होण्याची दूसरी घटना घडल्याने प्रशासनाचे कोविड रूग्णांच्या सुरक्षे बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

आज सकाळी अमळनेर येथील कोव्हीड केअर सेंटरमधून वावडे येथील कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण गायब असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे हे तपासणी कामी गेले असता निदर्शनास आले शोधा शोध केल्या नंतर पोलीसात खबर देण्यात आली व सायंकाळी तो बेवारस स्थितीत मृत अवस्थेत मिळून आला

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com