अमळनेर : वाळू माफीयांवर कारवाई

७ डंपरसह ४५ लाखाचा एैवज जप्त ,१३ जणांना अटक
अमळनेर : वाळू माफीयांवर कारवाई

अमळनेर - Amalner :

तालूक्यातील जळोद येथील तापी नदीतुन अवैधरित्या डंपर द्वारे वाळू वाहतूक करणाऱ्या रेती माफीयांवर दि १३ च्या पहाटे पोलिसांनी कार्यवाही करित सात डंपर व एक जेसीबी सह 45 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

विशेष म्हणजे या कार्यवाहित बड्या माश्यांना पोलीसांनी अटक केली यात चालक मालकासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत झालेली सर्वात मोठी कारवाई असून त्यामुळे वाळू वाहतुकदारांचे धाबे दणाणले आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून जळोद येथून तापी नदीतून मोठ्या प्रमाणात जेसीबी मशीन ने वाळू उपसा करून डंपर च्या साहाय्याने वाळू चोरी केली जात होती.

याबाबत वारंवार तक्रारी होत असतांना महसूल प्रशासन लहान वाळू वाहनांवर कारवाई करत होते मात्र प्रथमच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे , हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे , रवींद्र पाटील , भूषण बाविस्कर , अमोल पाटील , योगेश महाजन , सूर्यकांत साळुंखे यांचे पथक रात्रीची गस्त घालत असताना तापी नदीत अनेक डंपर वाळू वाहतुकीसाठी उतरल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी अचानक छापा टाकला .

तेथे सात डंपर व एक जेसीबी मशीन आढळून आले इतर डंपर व ट्रॅक्टर तसेच जेसीबी मशीन पळवून नेण्यात आले पोलिसांनी १० लाख रुपये किमतीचे जेसीबी क्रमांक एम एच १९ सी यु ५७६५ चालक गोपाळ रवींद्र पाटील रा नांद्री व मालक अमोल रमेश पाटील रा अमळगाव , ५ लाख रुपये किमतीचे डंपर क्रमांक एम एच १८ एम ४६८५ , चालक व मालक विक्की सतीश ललवाणी , ५ लाख रुपये किमतीचे डंपर एम एच १९ , झेड १९७० चालक व मालक दीपक शालीक पाटील रा नांद्री , ५ लाख रुपये किमतीचे डंपर एम एच १८ ,एम ५९४९ चालक विनोद महादू निकम रा शिरुडनाका व मालक किशोर बापू पाटील रा विवेकानंद नगर , ५ लाख रुपये किमतीचे डंपर क्रमांक एम एच १८ बिजी ७०३१ चालक दिनेश नागो पाटील रा बुधगाव ता चोपडा व मालक अरुण पुंडलिक पाटील रा रवी नगर , ५ लाख रुपये किमतीचे एम एच १८बी ए २९० , चालक संतोष हिरामण जावळे रा वाघोदा व मालक अरुण पुंडलिक पाटील , ५ लाख रुपये किमतीचे डंपर क्रमांक जी जे ०१ डी झेड ७५० वरील चालक दिलीप आत्माराम पाटील रा वाघोदे व मालक सुरेश देविदास वालडे , ५लाख रुपये किमतीचे डंपर क्रमांक एम एच ०४ , डी डी २१३६ चालक पपु शांताराम शिंगाणे रा भोईवाडा , मालक भूषण आत्माराम बडगुजर यांच्यावर अवैध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्या जवळील ३६ हजार रुपयांची वाळू असा एकूण ४५ लाख ३६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे तर आण्णा उर्फ अर्जुन वासुदेव कोळी रा जळोद याच्या मालकीचे एक जेसीबी , ४ ट्रॅक्टर व १ डंपर नदी पात्रातून पळून गेले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com