अमळनेर : करोना पॉझिटीव्हचे ३८ रूग्ण आढळले
जळगाव

अमळनेर : करोना पॉझिटीव्हचे ३८ रूग्ण आढळले

पॉझीटीव्ह रूग्णांची संख्या झाली ४४१

Rajendra Patil

अमळनेर-प्रतिनिधी Amalner

शहरात आज तब्बल ३८ रूग्णांचे अहवाल पॉझीटीव आले आहेत यामूळे पॉझीटीव रूग्णांची एकूण संख्या ४४१ झाली आहे आज पॉझीटीव आलेल्यांत ८ रूग्ण नविन भागातील असून ३० रूग्ण संपर्कातील आहे.

यात समाधानाची बाब म्हणजे आज १३२ रूग्णांचे अहवाल निगेटीव आले आहे जून्या संपर्कातील रूग्णांमध्ये ग्रामिण भागातील मंगरूळ ३ बहादरवाडी १ आर्डी १ तर शहरातील फर्शी रोड ६ मंगला देवी चौक ४ गूलमोहर कॉलनी १ सिंधी बाजार १ पानखिडकी १ ढेकू रोड वरिल लक्ष्मीनगर भागातील ४

तोलाणी मार्केट १ तर नविन ८ मध्ये सिधी बाजार २ शिरूड नाका सराफ बाजार मेघनगरी प्रत्येकी १ तर ग्रामिण भागातील ढेकूसिम आटाळे व मंगरूळ प्रत्येकी १ रूग्णांचा समावेश आहे आज पून्हा ३६ जणांचे स्वँब घेण्यात आले आहेत.

मागील व आजचे मिळून ८२ अहवाल प्रतिक्षेत आहेत तर ४४२ रूग्णांमध्ये ३० जणांचा मृत्यू झाला असून २९२ जण ऊपचार घेवून घरी परतले असल्याची माहिती तहसिलदार मिलींद वाघ यांनी दिली

तर १२० जण अमळनेर ग्रामिण रूग्णालय,प्रताप महाविद्यालयातील कोविड सेंटर व चोपडा ऊप जिल्हा रूग्णालय तसेच जिल्हा रूग्णालयात ऊपचार घेत असल्याची माहिती ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ताडे व तहसिलदार मिलींद वाघ यांनी दिली दरम्यान सुरवातीच्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यात हॉटस्पॉट ठरलेल्या अमळनेरात दि ७ पासून एका आठवड्या करिता जिल्हाधिकारींनी लॉकडाऊन जाहिर केला असून हि बंदी नसून कोरनाची साखळी तोडण्याची संधी आहे शासनाच्या नियमांचे पालन करून स्वरक्षणाकरीता घरीच रहा, असे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com