अमळनेर : वाळू माफीयांवर कार्यवाही

अमळनेर : वाळू माफीयांवर कार्यवाही

१४ जण अटकेत ५३ लाखाचा एैवज जप्त

अमळनेर - Amalner - प्रतिनिधी :

एकाच आठवड्यात दूसऱ्यांदा पोलीसांनी वाळू माफीयांवर कार्यवाही केल्याने अवैध वाहतूक दारांमध्ये खळबळ माजली आहे पोलीस प्रशासना कडून दूसऱ्यादा हि मोठी कार्यवाही झाली असतांना महसूल प्रशासन गप्प असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे .

गेल्या आठवड्यात तापी नदिवर अवैध वाळू वाहातूक करणाऱ्यावरील कार्यवाही नंतर आज बोरी नदिवर ८ ट्रक्टरसह चालक मालकासह १४ जणांना जेरबंद करित ५० वाळूसह लाखाचा एैवज जप्त केला आहे .

आज दि २१ रोजी पोलीस पथकाने पहाटे साध्या गणवेशात एका ट्रॅक्टरवर वाळू भरायला जात असल्याचे भासवून हिंगोणा शिवारात बोरी नदीत व इतरत्र अवैध वाळू वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर पकडले. या कारवाईत सुमारे ५३ लाखाचा माल जप्त करून मालक व चालक अशा १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रँक्टरमध्ये बसून मजूरांच्या वेशात मोहिम

पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, हेडकॉन्स्टेबल दीपक विसावे, हेडकॉन्स्टेबल संजय पाटील, पोलीस नाईक दीपक माळी, रवी पाटील, सुनील पाटील यांच्या पथकाने वाळू वाहतूक करणाऱ्यांनी ठिकठिकाणी ठेवलेल्या खबऱ्याना चकवा देत हि मोहिम फत्ते केली.

पारोळा रस्त्याने जाऊन एका खळ्यातील ट्रॅक्टर मालकाला विनंती करून त्या ट्रॅक्टरमध्ये साध्या गणवेशात पोलीस बसले. वाळू वाहतूक करायला चाललो आहोत, असे भासवून नदी पात्रात छापा टाकला. त्यात प्रत्येकी ७ लाख १० हजार रुपये किमतीचे ८ ट्रॅक्टर पकडले.

५३ लाखाचा एैवज जप्त

एमएच १८ एएन २३१३ मध्ये वाळू ट्रॅक्टरचालक शोएबखा मजीदखा रा.झामी चौक, मालक जमाल शेख रा.कसाली मोहल्ला, एमएच ४० एएल १३१८ चालक दीपक देविदास सोनवणे रा.देवळी, मालक रोहित कंखरे रा.पैलाड, एमएच १९ बीजी ८०२७ चालक सोमनाथ मधुकर सोनवणे, मालक आबा भोई, बिना नंबरचे ट्रॅक्टर चालक श्रीराम लहू पवार रा. मंगरूळ, मालक पपु रा. मंगरूळ, एमएच १८ झेड १९९८, चालक प्रवीण सुधाकर सोनवणे, मालक आकाश येवले रा.झामी चौक, एमएच १९ एएन १३१८, चालक अनिल राजू सोनवणे रा.रुबजी नगर, मालक रोहित कंखरे रा. पैलाड, एमएच १९, एपी ६८१० चालक व मालक मासुमखा भुऱ्या शब्बीरखा रा.अमळनेर यांना रंगेहाथ पकडले. या सर्वांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


त्याचप्रमाणे जवखेडा अंचालवाडी रस्त्यावर पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ यांना मांडळ येथील सुनील शांताराम भिल हा ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९ सीव्ही ९७६८मध्ये अवैध वाळू वाहतूक करताना आढळला.

त्याचा मालक वाघोदे येथील राहुल पाटील असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचे ट्रॅक्टर व वाळू जप्त करून दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकूण ५३ लाख १२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या कार्यवाहीने पोलीस प्रशासनाचे कौतूक होत आहे.

कार्यवाहीत सातत्य हवे

लॉकडाऊन मूळे रिकामे तरूणांचा या व्यवसायात वाढ झाली असून सहज मिळणारा ग्राहक चढा भाव व रोख पेमेंट या मूळे वाळू चोरी वाढली आहे तालूक्यात चारही बाजून तापी पांझरा व बोरी या ३ नद्या असल्याने वाळूचा ऊपसा करण्यास वाव मिळतो प्रशासनाने कार्यवाहीचे सातत ठेवल्यास या चोरीला आळा बसून वाळू माफीयांना जरब बसेल

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com