एकाच तरूणीचे अनेकांशी विवाह

तरूणीसह टोळीला पोलीसांनी केले जेरबंद
एकाच तरूणीचे अनेकांशी विवाह

अमळनेर - Amalner :

खान्देशातील विवाह इच्छूक तरूणांडून लाखो रूपये घेवून एकाच तरूणाीचे अनेकांशी विवाह करून रफूचक्कर होणाऱ्या व अवघ्या १५ दिवसात तरूणीचे दूसरे लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीला मारवड पोलिसांच्या सतर्कतेने पकडण्यात यश आले असून दोन महिलासह तिघांना अटक करण्यात आली आहे तर लग्न स्थळावरून इतर जण फरार झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, खान्देशातील शहादा तालूक्यातील मंदाणे येथील भूषण संतोष सैंदाणे याचे ६ मे रोजी हिंगोली येथील सोनू राजू शिंदे (रा सिद्धार्थ नगर) हिच्याशी लग्न झाले होते.

८ दिवस सदर वधू भूषण यांचे कडे राहिली मात्र १५ मे रोजी ती घरातून कोणालाही न सांगता पळून गेली १६ मे रोजी भूषण ने शहादा पोलीस स्टेशनला हरवल्याची फिर्याद दिली. या घटनेचा तपास हेडकॉन्स्टेबल दीपक परदेशी व विश्वास साळुंखे करीत होते.

दरम्यान ही मुलगी अमळनेर तालूक्यातील कपिलेश्वर या त्रिवेणी संगम असलेल्या मंदिरावर आज दि २१ रोजी पून्हा दुसरे लग्न करणार असल्याची गूप्त खबर मारवड पोलिसांना मिळाल्यावर मारवड पोलिस स्टेशनचे एपीआय राहुल फुला ,हेडकॉन्स्टेबल बबलू होळकर , अनिल राठोड व होमगार्ड चारुदत्त पाटील यांना सोबत घेत तातडीने कपिलेश्वर मंदिरावर पोहचले मात्र सदर विवाह जूळवणारी टोळी धूळे जिल्ह्यातील मुडावद तालुका शिंदखेडा येथे गेले असल्याची माहिती मिळाली.

त्यांचा पोलीसांनी पाठलाग केला असता तेथून ते जवळच असलेल्या पडावद येथे गेल्याचे समजले राहुल फुला यांनी तातडीने नरडाणा पोलिसांना कळविले व तिकडून पथक मागवले.

अखेर चकमा देणाऱ्या टोळीला पडावद येथे पकडले या ठिकाणी सोनू ही प्रवीण शिवाजी पाटील यांच्याकडे लग्न सोहळा करीत असल्याचे आढळून आले .

पोलिसांनी सदर कूटूंबाला विश्वासात घेत सोनूची बंटी बबली कथा सांगीतली व तातडीने सोनू व तिची मावशी पूजा प्रताप साळवे रा सिद्धार्थ नगर हिंगोली तसेच तिचा मामा योगेश संजय साठे रा शिवसेना नगर ता अकोला यांना त्यांच्या चार चाकी वाहनासह अटक केली,मुलीची आई व भाऊ पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

आरोपीना नरडाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नरडाना पोलिसांकडून ते शहादा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहेत पोलीसांच्या सतर्कतेने अनेक मूलांशी विवाह करणारी स्वतः वधूच सापडली असून पडावदचे कूटूंब यातून सूटले असले तरी समाजात मूली मिळत नाही व मूलीला सरकारी नोकरी असलेला मूलगा हवा यातून व्यावसायिक व शेतकरी व इतर काम करणाऱ्या विवाह योग्य मूलांना मूली मिळत नाही म्हणून पैसे देवून विदर्भासह इतर गावी अशा बोगस टोळीच्या मोहात अडकून फसवणूक होते पालकांनी अशा टोळी पासून सावध राहावे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com