अमळनेर - Amalner - प्रतिनिधी :

शहरात अवैधरित्या लाखो रूपयांचा सुमारे 80 किलो गांजा दुचाकीवरून वाहून आणणार्या तिघांना स्थानिक पोलीस अधिकारींच्या पथकाने पकडले असून त्यांचे कडून सूमारे 11 लाख 25 हजाराचा गांजा व 2 लाखाचे वाहाने जप्त केली आहे.

दोन वर्षा पूर्वी देखील अश्याच प्रकारे गांजा तस्करी करणार्यांवर कार्यवाही झाली होती. बाहेरगावाहून शहरात अवैध रित्या गांजाची तस्करी करणार्यांपैकी एकाकडून पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून ढेकूजवळील दत्त मंदिराजवळ तपासणी पथकाने साफळा रचून स्थानिक ग्रामस्थांचे मदतीने दि.28 रोजी रात्री 11 वाजता ही कारवाई करण्यात आली.यातील 1 आरोपी धरणगांव तालूक्यातील मूसळी येथील आहे ऐवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता 1 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी पोकाँ रवींद्र अभिमन पाटील, दीपक भाऊलाल विसावे , पोहेकाँ किशोर माधवराव पाटील , पोहेकाँ अरुण बागुल , पोना दिपक माळी , पोना शरद तुकाराम पाटील , पोना हितेष लोटन चिंचोरे , पोकाँ भूषण शिवाजी बाविस्कर, पोकाँ आशिष गायकवाड, चालक पोकाँ सुनिल भभुता पाटील यांना बोलावून अमळनेर ते हेडावे रोडवरील ढेकूकडून तीन व्यक्ती दुचाकीवर गांजा घेऊन येत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर या पथकाने ढेकू गावाजवळ जाऊन दत्त मंदिराचा आडोसा घेतला. तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या सत्संगाला उपस्थित काही नागरिकांना दुचाकींवर लक्ष ठेवण्याचे सांगितले. त्यानुसार रात्री ठरलेल्या ठिकाणाहून तीन व्यक्ती दुचाकीवरून प्लास्टिक गोण्या घेऊन जातांना आढळून आले. त्यांना पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले असता त्यांच्याकडे तिन प्लास्टीक गोण्या आढळून आल्या.

त्यातून उग्र वास येऊ लागल्याने गांजा असल्याची पोलिस पथकाची खात्री झाल्याने आरोपी राजू भावलाल पवार (वय 37 वर्षे, रा. केवडीपुरा ), मनोज मदन पवार (वय 27 वर्षे, रा. टाकडी) दिनेश मेवालाल बेलदार (वय 30 वर्षे, रा. मुसळी, ता. धरणगांव) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे एकूण 75 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.

या गांजाच्या साठ्यासह त्यांच्याकडून दुचाकी (क्रमांक एमएच- 19, डीसी- 2475) व दुसरी दुचाकी (एमएच- 19, डीजे- 8730) जप्त करण्यात आल्या.सदर त्यांच्या किमती 2 लाख रुपये आहेत. असा 11 लाख 25 हजार रुपयांच्या गांज्यासह 2 लाखांच्या दोन दुचाकी मिळून एकूण 13 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज मिळून आला आहे.

याप्रकरणी पोकाँ रवींद्र अभिमन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एनडीपीएस अधिनियम कलम 8, 20, 22 सह भांदवि कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अंबादास मोरे करीत आहेत. तसेच यासाठी नरेद्र दामु पवार, भगवान दंगल पाटील, नथ्थु गुणवंतराव सोनवणे, उमराव गंभीरराव पाटील, चंद्रकांत रमेश पाटील, वासुदेव श्रावण पाटील (सर्व. रा. ढेकु खुर्द ता. अमळनेर) या ग्रामस्थांनीही मोलाची मदत केली.