अमळनेरात आढळले तब्बल ९५ पॉझिटिव्ह रुग्ण

अमळनेरात आढळले तब्बल ९५ पॉझिटिव्ह रुग्ण

अमळनेर - Amalner - प्रतिनिधी :

तालूक्यात आज एकुण ९५ रूग्णांचे अहवाल पाॅझीटीव्ह आल्याने एकूण रूग्ण संख्या १८२७ झाली आहे. तर उपचार घेऊन कोरोनाशी झूंज देवून बरे होणाऱ्यांची संख्या देखील हजारी पार झाली आहे.

तब्बल १०८९ रूग्ण विविध रूग्णालयातून उपचार घेवून घरी परतले आहे तर दूर्दैवाची बाब म्हणजे एकूण आज अखेर ५९ जण मयत झाले आहेत आज पाॅझीटीव्ह आलेल्यांमध्ये नविन तब्बल ६६ रूग्णांचा समावेश आहे.

अमळनेर शहरात एकूण तब्बल ५२ तर ग्रामीण ९ तर खाजगी रूग्णालयात ५ असे एकूण ६६ जण पॉझीटीव आल्याने शहरात कोरोनाने कहर केला आहे तर ऊर्वरित २९ रूग्ण संपर्कातील आहेत यामूळे आज अखेर एकूण रूग्ण संख्या १८२७ झाली आहे.

जिल्ह्यात अमळनेर तालूका कोरोना रूग्ण संख्येत गेल्या आठवड्या पासून दूसऱ्या क्रमांकावरच आहे हि संख्या सतत वाढत असून कमी होणे किंवा साखळी तोडण्यास आरोग्य विभागाला अजूनही यश मिळत नसले तरी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सूरूच आहे.

सर्वच रूग्णालये फूल्ल झाली आहे सद्या शहरातील खाजगी ३ व धूळे रोडवरील नव्याने सूरू झालेल्या ४ कोविड रूग्णालयांसह पारोळा व जळगाव शासकीय कोरोना रूग्णालय व सेंटर मध्ये तब्बल ६८० रूग्ण ऊपचार घेत आहेत.

आज एकूण १९ रूग्ण ऊपचार घेवून घरी परतले आहेत अशी माहिती तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे यांनी दिली

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com